Lyrics: Rohan Sakhre Music: Sagar Janardhan सागर किनारी येते भरती आपले पिरमाला पाहुनि झयलो येरा राणी केला तू दिवना
सागर किनारी येते भरती आपले पिरमाला पाहुनि झयलो येरा राणी केला तू दिवना
तुझी अदा जशी नाजूक हरनी तू गो भिडली काळजाला तुझ्या नावानं दिल यो धक धक करी राणी जाऊ चल बंदराला मौसम यो आयलाय आयलाय पिरमाचा
तुफान उठलंय ग उठलंय गो दर्या इश्कचा ||धृ||
तिर तुझ्या त्या नजरेचा माझं काळीज ग चिरतंय
साज तुझा यो नशीला मन हरवूनशी नेतय
प्रीत आशिरे ही सजणा जीव तुझे साठी झुरतंय तुझी हाक ऐकुनी मी गीत तुझे रे गुण गुणतय
तुला भेटूनशी राणी तुझ्यात दिल यो लागला रुळायला ह्या आकाशी हा इंद्रधनुष्य सप्त रंगानी सजला
मौसम यो आयलाय आयलाय पिरमाचा || १ ||
रूप तुझ हे मखमली मन नादाला ग लावलाय लट रेशमी गालावरी गंध तुझा यो दरवळतंय
जीव माझ्या तुझ्या मंदी माझ्या मनाला ग कळलंय रोज मला ही रातीला स्वप्न तुझं चं ग पडलंय
तुझ्या इशाकाच्या जाळ्या मधी जीव लागला भुलायला तुझ्या संगतीने राजा सपना उद्याचा लागला सजायला मौसम यो आयलाय आयलाय पिरमाचा || 2 ||