Lyrics: Anamish तू असता जग सारे कवेत येते आभाळी चांदणी चाहूल देते चांदोबा रातीला लुकलुक होई लाडके तुजसाठी गाते अंगाई हा निळासा किनारा वारा घाले तारे बघ सारे उब घेऊन आले नभ करतो पाळणा ह्या लाटांचा अवकाशातून शांत नाद हा नक्षत्रांचा चांदण्या झोपल्या चंद्र नभी जाई लाडके तुजसाठी गाते अंगाई वाऱ्याचे झोके सय मायेची छोट्याश्या हाताला लय ममतेची डोळ्यात तुझिया स्वप्ने राणी पाहता तुजला ये डोळा पाणी झोप तुही आता झोपे नवलाई लाडके तुजसाठी गाते अंगाई