Lyrics: Avantika Bahirat
Music: Aditya Patekar
तू सूर अंतरीचा मी रागिणी तुझी रे ...
तू काळजाचा ठोका मी काळीज खुळ रे !
तू प्रेमगीत माझे मी बासरी तुझी रे ...
।।धृ।। तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे ।।धृ।।
तुझी वाट पाहते तुझी प्रीत जाणते
तूझ्या प्रीतीचं गोंदण माझ्या भाळी माखते!
तू बावळा चकोर मी रातराणी झाले
तू चांद तो नभाचा मी चांदणी तुझी रे ।।१।।
।।धृ।। तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे ।।धृ।।
मोरपिस मखमली तुझे स्पर्शती ते रेशमी रे...
सूर वेणूचे अंग छेडती, मी मज विसरून गेले !
तू आतुर सागर मी बावरी नदी रे !
तू थेंब पावसाचा मी गंध मातीचा रे ! ।।२।।
।।धृ।। तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे ।।धृ।।
राधा राधा मी कान्हा तुझा राधे बिन कान्हा अधूरा तुझा
सात जन्मीचं सपान रोज डोळ्यात पाहिलं
तुझ्या जगण्याचं लेण माझ्या केसात माळलं
तू श्वास श्वास माझा मी जिंदगी तुझी रे
तू चित्तचोर माझा मी मोहिनी तुझी रे ।।३।।
।।धृ।। तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे ।।धृ।।