Lyrics: Charwak Madhuri
Music: Charwak Madhuri
तु इथे जवळी रहा,
छळतो मला एकांत हा. . .
पापण्यांचा गोडवा तुझ्या ह्या,
जणु मधुर जलधारा.
सौंदर्याचा हा रसाळ मध मी,
पीउन घेई सारा.
हळवे हे मन कसे
चोरुनी पाहे तुला!
तु नसता डोळ्यात या,
एकाकी वाटे मला.
कळपा मध्ये, बदकांसवे असतो मी,
राजहंस हा. . .
न सांगता आली अलगद मनी तु,
कळले नाही जिवा.
भेटशी तु नव्याने अशी हा,
श्वास वाटे नवा.
तुझ्यामुळे तेजोमयी,
झाल्या या पाउलखुणा.
तुझ्याविणा जग जसे,
रातिविणा काजवा.
अंधारल्या स्वप्नांमध्ये पाहतो मी,
चंद्रहार हा. . .
तु इथे जवळी रहा,
छळतो मला एकांत हा. . .