Shala Marathi (From "Krantijyoti Vidyalay - Marathi Madhyam")

Lyrics: Ishwar Andhare Music: Harsh-Vijay शाळा मराठी आमची, शाळा मराठी वं, जशी लेकरा माय,धरतीया पोटी वं, गुरुजी आनं बाई, आमचं गुरु आनं आई, जशी ज्योतिबा संग, सावित्री माई, शाळा मराठी आमची,शाळा मराठी वं, जशी लेकरा माय,धरतीया पोटी वं, दगडाच्या भीती,त्याला कौलारूचं छत, वर्गामदी आमच्या दादा,घरपन मोठं, सरसोती मायेचं,आम्हा वरदान, विद्यावान आम्ही,खरं धनवान, शाळा मराठी,आमची शाळा मराठी शाळा मराठी आमची, शाळा मराठी वं, जशी लेकरा माय,धरतीया पोटी वं, चला,चला.. इयत्ता पहिली,दुसरी,तिसरी चौथी चे विद्यार्थी आपापल्या वर्गात चला.. वर्ग शिक्षकाना विनंती आहे. विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करा.. जय हिंद, जय महाराष्ट्र