Lyrics: Ratan Awasarmol
Music: Pravin Kuwar
दूर दूर का
तुझी माया दूर का
तुझी सय दाटे .. ग आई
रिते जग वाटे ... ग... आई…
तू गेल्या नंतर आई, आयुष्यच बदलून गेल ग.
तू गेल्या नंतर आई, तुझे रोप फळाला आले ग. x2
खरा सुखाचा प्रवास झाला सुरू.
त्या प्रवासात तू नाहीस.
अमावसेच्या राती पोर्णिमेच्या
सुखा साठी तू नाहीस.
तू गेल्या नंतर आई..
आई आई x २
खरा मोहोर झाला सुरू.
फळे फुले बहरली.
पण तू नसल्याने आई अमुची
मने अशी गहीवरीली.
तू गेल्या नंतर आई
आई आई x २
जग सुन- सुन झाल
मन सुन्न-सुन्न हे झाल
बाबा ही सोडून गेले
मन आमचे मोडून गेले
शेवटचा दुवा निखळून पडला
धड काळजाचा निखळला
सुख दुःख कोणाला सांगू
कुण्या बोटा धरून रांगू
मी आशीष कोणा मागू
आई आई x २