Lyrics: Dnyaneshwar Shilawane Music: Nihar Shembekar/Shardul Sakhale हे विश्वात्मक ईश्वर सदगुरु श्री भगवान आनंदित होवोनी माझ्या वाग यज्ञानं विश्वा अखंड यावे समृध्दीचे उधाण द्यावे द्यावे मज हे महाप्रसादाचे दान
दान दान दान पसायदान
कुप्रवृती दुष्टातील व्हावी पुर्ण नष्ट सत्कर्मी रमणे ही वृत्ती व्हावी धष्टपुष्ट
सर्व प्राणीमात्रात दृढ मैत्री जडो स्वधर्मसूर्याने विश्वाला उजळो तम जाऊनी तिन्ही लोक सुखाने नांदो विश्वाने अखिल आदीपुरुषाला भजो ह्या सदिच्छा पूर्ण व्हाव्या हे भगवान
जे महंत सचेतन चिंतामणीचे गाव ईश्वरनिष्ठ करी मांगल्याचा वर्षाव अमृताचे सागर कल्पतरूचे उद्यान उष्णतारहित सूर्य सत्पुरुष ते महान संत भेटू दे कलंकरहित चंद्रासमान
सजेल जो या ग्रंथानुसार आचरणाने मिरवेल तो सुखसमृद्धीच्या विजयाने म्हणे विश्वराव मिळेल हे प्रसादाचे दान ज्ञानदेव सुखी जाहले मिळता हे वरदान