Lyrics: Yogesh Save
Music: Tanmay Bhave
मी छान दिसते!!
भिर भिर वाऱ्याने
गुलाबी गालावरी
बट माझी उडते
मी छान दिसते!!
काजळरातीला
डोळ्यात भरुनी
तुझ्याकडे पाहते
मी छान दिसते!!
जवा नाकात नथ
अन पायात पैंजण
घालून मिरवते
मी छान...
माझ्या डोळ्यात धुंदी
प्रेमाची
तुझ्या डोळ्यांना मला ती
सांगायची
लाजून मी बावरून मी
वाट तुझी पाहते
मी छान...