Lyrics: Brahmaa/Bhushan Vishwanath Music: Brahmaa पैलवान
अलोया मातीत निधड्या छातीन (२) दावयला आसमान आर मारदाना माझी र शान झालोया मी पैलवान अख्या महाराष्ट्राची शान (२) मला बजरांगाच दान अख्या महाराष्ट्राची शान झालोया मी पैलवान अख्या महाराष्ट्राची शान
हान बडिव तोड रडिव धर धर धर जागेवर तुडिव जो आला तो गेला माती मधे आडवा केला खाली होता वर नेला मला म्हणे बनव चेला कोनी इथ टिकल नाही माझा समोर जिकल नाही म्हसोबा ची ताकत कधी कुठे झुकलो नाही बाजरंगाच दान मी तोडले माझे कान मांडी ठोडून हाथ वर बनलो महाराष्ट्राची शान ह्यो माती मधला खेळ मी माती मधला शेर करतो जागेवर चीत मला लागत नसत येळ महाराष्ट्राच्या पैलवनाच जागामधे नाव आहे सांगायची गरज नाही कोल्हापूर गाव आहे गावरान गडी मी गावरान दाव आहे मर्दानी खेळ रोज घामाच याडं हाय
तू खचू नकोस (होय मर्दा) कुठ थांबू नकोस (ऊठ मर्दा) राजा येईल तुझ राज्य (होय मर्दा) मेहनत सोडू नकोस (लढ मर्दा) तालीम आमची जीव की प्राण कंबर खेचून लावतो मी जान जोर सपात्या लाऊन गडी झालाया हा बेभान आर मारदाना माझी र शान झालोया मी पैलवान अख्या महाराष्ट्राची शान (२) मला बजरांगाच दान अख्या महाराष्ट्राची शान झालोया मी पैलवान अख्या महाराष्ट्राची शान