Lyrics: Pallavi Thorave
Music: Ashok Waingankar
आई तुझ देऊळ हाय डोंगरावर,
ते बांधील हाय दगडावर,
तुझ्या भेटसाठी अतुर जीव हा झैलाई गो ,
तुझी वटी भरावा सोन्याचा नारळ आणलाय गो||ध्रु||
कारले गावाची वाट लय भारी
सपणात दिसते मजला सारी,
तुला भेटाला संगतीला नाऱ्याचा टांगा आणलाय गो
तुझी वटी भरावा सोन्याचा नारळ आणलाय गो||१||
आई नेसली जरीची साडी,
बघावा जमले गावकरी,
तुला बघुन माझ्या मनान आनंद झालाय गो,
तुझी वटी भरावा सोन्याचा नारळ आणलाय गो||२||