Lyrics: Prajakt Deshmukh
Music: Sanket Puranik
जरा सांज होता उदासी उगवते
वाळूत पाऊल कुणाचे जळे
तिथे पश्चिमेला तुझ्या डोळियांच्या
कुणी सावळे सांग रचले तळे
तुझा चेहरा ओंजळी घेतला पण
हवेसे खळे, टिंब गेले कुठे
कुठे नाहीसा चंद्र भिवईतला अन्
तिथे ठेवली फोड गेली कुठे
जणू एरवी पारवा तो घुमावा
तसे भिरभिरे केश निश्चल कसे?
जशी सागरी झिंग वा-यास येते
तसे चित्त गाफील इथे ना तिथे
तुला आसमंती हवी झेपही अन्
तुला सागराचे उसासे कळे
जपे हासणे अन् जपे वेदनाही
असेही निळे अन् तसेही निळे