Lyrics: Ratnakar Matkari
Music: Harsh-Vijay
स्वर्गात आकाशगंगा…
गंगेला सोनेरी घाट
ए स्वर्गात आकाशगंगा…
गंगेला सोनेरी घाट
घाटाला पायऱ्या शंभर
ए घाटाला पायऱ्या शंभर..
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार
घाटाशी लावीला एक…
एक स्वर्गीय कल्पतरू
ए घाटाशी लावीला एक…
एक स्वर्गीय कल्पतरू
तरूला फांद्या शंभर
ए तरूला फांद्या शंभर…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार
तरूच्या फांदीवर... फुले फुलती नक्षत्रांची…
तरूच्या फांदीवर... फुले फुलती नक्षत्रांची…
फुलाला पाकळ्या शंभर…
फुलाला पाकळ्या शंभर
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार
ए सुटलं वारं जोरात...
फुले विखुरली पाण्यात
ए सुटलं वारं जोरात...
फुले विखुरली पाण्यात
तरंग उठले शंभर…
ए तरंग उठले शंभर
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार
गंगेला आला पूर…
अहो पुराचं पाणी चढलं
गंगेला आला पूर…
अहो पुराचं पाणी चढलं
बुडाल्या पायऱ्या शंभर..
अहो बुडाल्या पायऱ्या शंभर
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
झाला आनंद आली बहार…
एssss