Lyrics: Arun Sangole
Music: Sanket S Joshi
जो विश्वाचे करितो पालन
तन मन करितो अवघे पावन
तो हा माझा देव दयाघन,
शेगावीचा संत गजानन !
गजानन...शेगावीचा संत गजानन !
( गण गण गणांत बोते !
चिंता सरती विघ्ने पळती
नामे स्मरता दु:ख्खे हरती
अनंत कोटी भरुनी वाहे,
जनी मनी हा जगी जनार्दन !
गजानन...शेगावीचा संत गजानन !
( गण गण गणांत बोते !
भक्तगणांना हाच तारतो
हाच भावतो.. हाच पावतो
हाच एक जो या ब्रह्मांडी
परमात्म्यासम असे चिरंतन !
गजानन...शेगावीचा संत गजानन !
( गण गण गणांत बोते ! )
गजाननाच्या अद्भुत लीला
सकळां ठाव्या आज घडीला
जन्माची ही वारी देई,
या जगण्याला नवसंजीवन !
गजानन...शेगावीचा संत गजानन !
( गण गण गणांत बोते..)