Lyrics: Saveeta Karanjkar Jamale
Music: Kiran Kalkumbe/Vishal Shinde
तुह्या पैंजनाची चाहूल
गोरं नाजूक (गं) पाऊल..2
तू चांदणी नभातली दूर दूर दूर
लागली जीवाला तुझीच हूर हूर हूर
रातरानी गात गात बहरली एक साथ
सावल्याही खेळती गं सोबतीला चांद रात
मन उनाड उनाड
मागं मागं तुझ्या पळतया
तुझ्या गं संगतीन येडं
बेभान हे झुलतया ।।धृ ।।
आलीया याद तुझी आलीया
झालंया गारुड हे झालंया
भेटला स्वप्नात तू आज
हसू गालात वाटते लाज
रातराणी गात गात बहरली एक साथ
सावल्याही खेळती गं सोबतीला चांदरात
मन उनाड उनाड
मागं मागं तुझ्या पळतया
तुझ्या रं संगतीन येडं
बेभान हे झुलतया ।।1।।
हरतोया धीर कधीचा हरतोया
बघतोया वाट तुझी मी बघतोया
रचला मनाचा हा खेळ
तुझ्या स्पर्शाने झालोया धुंद
रातराणी गात गात बहरली एक साथ
सावल्याही खेळती गं सोबतीला चांदरात
मन उनाड उनाड
मागं मागं तुझ्या पळतया
तुझ्या ग संगतीन येडं
बेभान हे झुलतया ।।2।।