Shivdarara (From "Ranapati Shivray Swari Agra")

Lyrics: Digpal Lanjekar Music: Avadhoot Gandhi/Mayur Raut सह्याद्रीचा राजा लाटा म्हणती जय आरमार उभं समिंद्रान शिवदरारा हाय..
किल्ले उभं पाण्यावरती झेंडे फडकती वाऱ्यात शिवराय त्ये आले बघा समिंद्राच्या सौराज्यात!
सह्याद्रीत जन्मला वाघ माती रक्तात, डोळ्यात आग डोंगर, जंगल, गनिमी कावा शत्रू थरकाप, नावात आग
राजा पाहतो दूरवर निळ्या पाण्यात खोल नजर फिरंगी, सुलतान सिद्दीची झाली बघा धावपळ
सिंधुदुर्ग आन रत्नागिरी किल्ले शत्रूच्या उरावरी कोळ्यांनी फुंकले शिंग चढते युद्धाची झिंग
सह्याद्रीचा राजा लाटा म्हणती जय दर्याभवानी प्रसन्न तुला शिवदरारा हाय