Lyrics: Prajakt Deshmukh
Music: Shreenath Mhatre
ते ही बरोबर होते तसे अन्
हे ही कुठे चूक आहे तरी ?
उगा रान धुंडून थकल्यावरी मग
सापडे आतली कस्तुरी
कशाला उगाचच किन्तुपरन्तु
जरतर ची गाणी नको ना आता
चुकली गणिते चुकू दे नव्याने
मांडू आता या नव्या शक्यता
नको तोलणे हे क्षणांना क्षणांशी
भिजवी तयांना म्हणूया सरी ||1||
फुलपाखराचे जगणे दिसांचे
भांडूही आपण तसे तेवढे
भिंती नको फक्त खिडक्याच ठेवू
बांधूही आपण तसे तेवढे
होते मिरवले जसे संगतीला
मिरवू तडे ही जणू भरजरी।।२।।